बुलेट चोरी करणारे गजाआड

0

धुळे प्रतिनिधी । येथील एलसीबी विभागाने समाधान पाटील आणि चेतन कापडणे यांना बुलेट चोरीच्या आरोपातून अटक केली असून या दोघांकडून सहा बुलेट जप्त केल्या आहेत.

आवश्यक चौकशीनंतर वाहन संबंधित मालकाला दिले जाईल. बुलेट चोरीच्या तक्रारी असलेल्यांनी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. धक्कादायक बाब म्हणजे बुलेटची प्रचंड आवड असली तरी आपण विकत घेऊ शकत नसल्याच्या कारणातून या दोन्ही तरूणांनी हा मार्ग पत्करल्याची माहिती समोर आली आहे.