मुंबई। पंतप्रधान मोदींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेली मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन पहिल्याच स्टेशनवर रखडली आहे. बीकेसीमधील रेल्वेला हवी असलेली जागा देण्यास राज्य सरकारने नकार दिल्यामुळे हा प्रकल्प सुरु होण्याआधीच आता अडचणीत सापडला आहे. बुलेट ट्रेनच्या वांद्रेकुर्ला संकुल म्हणजेच बीकेसीमधील स्टेशनच्या जागेवरून राज्य सरकार आणि रेल्वे विभाग यांच्यात मतभेद आहेत. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा विस्तार नागपूरपर्यंत करून द्यावा, अशी अट राज्यशासनाने घातल्यामुळे या प्रकल्पाला राज्य सरकारच्या अपेक्षांचा बांध लागला आहे. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत या प्रकल्पाबाबत राज्य सरकारने ठाम भूमिका घेतली आहे. बैठकीत राज्य सरकारने त्यांना हव्या असलेल्या जागेला विरोध केला आहे.