बूस्टर अकादमी (अ) विजयी

0

ठाणे। बूस्टर अकादमीच्या अ संघाने क संघाचा पराभव करत जिंदाल स्टील-टेबल टेनिस अकादमी आयोजित ठाणे जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धेतील वरिष्ठ गटाच्या सांघिक लढतींचे विजेतेपद मिळवले. ज्युनीअर गटाच्या सांघिक लढतींमध्ये ऑफीसर्स क्लबच्या अ संघाने यजमान संघावर 3-1 असा विजय मिळवत बाजी मारली.

या स्पर्धेतील वरिष्ठ गटाच्या उपांत्य फेरीच्या लढतीत बूस्टर अकादमीच्या अ संघाने बदलापूर टेबल टेनिस अकादमीच्या अ संघाचा 3-1 असा पराभव केला. अन्य लढतीत बूस्टर अकादमीच्या क संघाने ब संघाचे आव्हान संपुष्टात आणले होते. ज्युनिअर गटाच्या उपांत्य फेरीच्या लढतींमध्ये ऑफिसर्स क्लबच्या अ संघाने आपल्याच ब संघावर 3-0 असा विजय मिळवला होता.