मुंबई : दहशतवादी तसेच देशविघातक घटकांकडून कोणत्याही प्रकारे हवाई आक्रमण किंवा अन्यप्रकारे सर्वसामान्यांच्या जीविताला धोका निर्माण होऊ नये यासाठी ३० मे ते २८ जून या कालावधीत बृहन्मुंबई हवाई क्षेत्र अतिलघु विमाने, ड्रोन आदींसाठी प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे.
यानुसार या हवाई क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे अग्निुअस्त्रे (एअर मिसाईल्स), पॅराग्लायडर्स, रिमोट कंट्रोलमार्फत उडविण्यात येणारी अतिलघु (मायक्रोलाईट) विमाने, ड्रोन उडविण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. याबाबतचे आदेश बृहन्मुंबईच्या पोलीस उपआयुक्त (ऑपरेशन्स) रश्मी शुक्ला यांनी जारी केले आहेत.