बृहन्मुंबई क्षेत्र अतिलघु विमानांसाठी प्रतिबंधीत

0

मुंबई : दहशतवादी तसेच देशविघातक घटकांकडून कोणत्याही प्रकारे हवाई आक्रमण किंवा अन्य प्रकारे सर्वसामान्यांच्या जीविताला धोका निर्माण होऊ नये, यासाठी येत्या २८ जुलैपर्यंत बृहन्मुंबई हवाई क्षेत्र अतिलघु विमाने, ड्रोन आदींसाठी प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषीत करण्यात आले आहे. यानुसार या हवाई क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे अग्नितअस्त्रे (एअर मिसाईल्स), पॅराग्लायडर्स, रिमोट कंट्रोलमार्फत उडविण्यात येणारी अतिलघु (मायक्रोलाईट) विमाने, ड्रोन उडविण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. याबाबतचे आदेश बृहन्मुंबई पोलीस उपआयुक्त (ऑपरेशन्स) यांनी जारी केले आहेत.

आंतरराष्ट्रीय विमानतळाचा फ्री फ्लाईट झोनही प्रतिबंधीत
त्याचबरोबर छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मुक्त उड्डाण क्षेत्रामध्ये (फ्री फ्लाईट झोन) पॅराग्लायडर्स, बलून, उंच जाणारे फटाके, हलक्या वस्तू, पतंग उडविण्यास तसेच लेसर प्रकाश (बीम) सोडून विमानांच्या लँडींग आणि फ्लाईटमध्ये अडथळा आणण्यास प्रतिबंध करण्याचे आदेश २७ ऑगस्टपर्यंतच्या कालावधीसाठी जारी करण्यात आले आहेत. अशा घटना नजरेस पडल्या तर पोलिसांना कळवावे, असे आवाहन सासनाने केले आहे.