बॅक फ्लिप करताना बॉडी बिल्डरचा दुर्दैवी मृत्यू

0

डरबन। दक्षिण आफ्रिकेच्या बॉडी बिल्डरचा एका स्पर्धेत मानेचे हाड मोडून मृत्यू झालाचे समोर आले आहे. माजी आएफबीबी जुनियर चॅम्पियन सिफिसो लंगेलो थाबेटने असे या बॉडी बिल्जरचे नाव आहे. तो भर स्डेडियममध्ये बॅकफ्लिप मारत असताना त्याला जीव गमवावा लागला.

तो अवघ्या 23 वर्षांचा होता. स्टेडियमध्ये प्रेक्षकांच्या उडंद प्रतिसादाने त्याला हुरुप आला. 75 किलो वजनी गटाच्या स्पर्धेत मॅटच्या मध्यभागी येऊन सिफिसो थाबेटने बॅकफ्लिप मारण्याचा प्रयत्न केला. परंतु ग्रिप सुटल्याने तो जमिनीवर कोसळला. या घटनेत मानेचं हाड मोडल्याने तो जमिनीवर निपचित पडून राहिला. यानंतर त्याने प्राण सोडले. दक्षिण आफ्रिकेत मागील आठवड्यात शनिवारी (5 ऑगस्ट) ही स्पर्धा पार पडली. या दुर्दैवी घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सिफिसो लंगेलो थाबेटच्या मृत्यूमुळे बॉडीबिल्डिंग क्षेत्रात खळबळ माजली आहे. थाबेट हा दक्षिण आफ्रिकेच्या क्वाझुलू नतालच्या उम्लाझीचा रहिवासी होता.