बॅटरी तयार करणार्‍या कंपनीत चोरी

0

जळगाव । एमआयडीसीत बॅटरी तयार करणार्‍या एका कंपनीतून 35 हजार रूपयांचे सिल्ली लिडचे 8 नग चोरीस गेल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. या प्ररकणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.एमआयडीसीमध्ये ई 80 क्रमांकाची आनंद बॅटरी ही लखन बुधानी यांची कंपनी आहे. रविवारी रात्री चोरट्यांनी या कंपनीत तयार झालेले सिल्ली लिडचे 8 नग चोरून नेले. या लिडची किंमत 35 हजार रूपये आहे

सीसीटीव्ही फुटेज घेतले ताब्यात
सोमवारी सकाळी कंपनीचे व्यवस्थापक प्रमोद पाटील यांच्या निदर्शनास ही बाब आली. त्यांनी मालकांना फोन करून माहिती दिली. व नंतर एमआयडीसी पोलिस ठाण्यात येऊन माहिती दिली. बुधाणी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय पाटील तपास करीत आहेत. कंपनीच्या आवारात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात तीन चोरटे लिड चोरत असल्याचे दिसून आले आहे. पोलिसांनी हे फुटेज ताब्यात घेतले असून चोरट्यांचा तपास सुरू केला आहे.