पुणे : पुण्याची राष्ट्रीय बँडमिंडन पट्टू गौरी पवार यांचे वडील प्रमोद पवार (चांगभले) यांचा रविवारी पहाटे चार वाजता पुणे-नगर रस्त्याच्या कडेला मृतदेह आढळला. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. प्रमोद पवार हे काल रात्री ते मित्रांसोबत पार्टीसाठी कोरेगाव पार्क परिसरात गेले होते. त्यांच्याकडे दुचाकी होती. पुणे : पुण्याची राष्ट्रीय बँडमिंडन पट्टू गौरी पवार यांचे वडील प्रमोद पवार (चांगभले) यांचा रविवारी पहाटे चार वाजता पुणे-नगर रस्त्याच्या कडेला मृतदेह आढळला. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. प्रमोद पवार हे काल रात्री ते मित्रांसोबत पार्टीसाठी कोरेगाव पार्क परिसरात गेले होते. त्यांच्याकडे दुचाकी होती.
दुचाकी सापडली नाही रात्री दोन नंतर पार्टीकरून ते एकटे तेथून निघून गेले. त्यांनतर त्यांचा मृतदेह वाघोली रस्त्यावर आढळून आला आहे. मात्र, अपघात आहे की घातपात हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यांच्या शरीरावर जखमा आढळून न आल्याने अपघाताची शक्यता कमी आहे. तेथे त्यांची गाडीही मिळाली नाही. त्यांचा मृत्यू मध्यरात्री दोननंतर झाला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे.
मृत्यू संशयास्पदप्रमोद पवार यांचा मृत्यू संशयास्पद असण्याची शक्यता नातेवाईक व्यक्त करत आहेत. लोणीकंद, लोणीकाळभोर, चंदननगर पोलिसांकडे याबाबत काही माहिती नाही की नोंद नाही. त्यांचा मृत देह ससून रूग्णालयात आणण्यात आला होता. पवार कुटुंबीय मूळचे बार्शी येथील असून, कोथरूड परिसरात राहण्यास होते. त्यांचा फर्निचरचा कारखाना आहे. तर मुलगी गौरी पवार ही डेक्कन जिमखाना येथे बॅडमिंटन खेळते. ती राष्ट्रीयस्तरावर विम्बल्डन स्पर्धा खेळली आहे.