बॅडमिंटन स्पर्धेत एरंडोलच्या अथर्व विंचूरकरचे यश

0

एरंडोल । येथील रामनाथ तिलोकचंद काबरे विद्यालयाचा विद्यार्थी अथर्व शिरीष विंचूरकर ह्याने जळगाव येथील एकलव्य क्रीडा संकुलाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या क्रीडा प्रशिक्षण शिबिरात बॅडमिंटनमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त करून यश मिळवले. जळगाव येथील एकलव्य क्रीडा संकुलाच्या वतीने 15 एप्रिल ते 15 मे दरम्यान क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात अथर्व विंचूरकर याने प्रथम क्रमांक मिळवला. क्रीडा संकुलात एम.जे.कॉलेजचे प्राचार्य उदय कुलकर्णी यांच्याहस्ते स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

अथर्वचे सर्व स्तरावरून कौतूक
यावेळी ओरिएन्ट सीबीएससी विद्यालयाच्या प्राचार्या सुषमा कंची, ज्ञानज्योती इन्स्टिट्यूटचे संचालक जी.सी.कुलकर्णी यांचेसह शिक्षण क्षेत्रातील पदाधिकारी उपस्थित होते. पत्रकार शिरीष विंचुरकर यांचा अथर्व हा सुपुत्र आहे. एकलव्य क्रीडा संकुलाचे संचालक श्रीकृष्ण बेलोरकर, निलेश जोशी, रणजीत पाटील यांचे त्यास मार्गदर्शन लाभले. प्रा.शिवाजीराव आहीराव, माजी उपनगराध्यक्षा शकुंतला अहिरराव, आर.एन.कुलकर्णी, मुख्याध्यापिका रोहिणी मानुधने, रा.हि.जाजू प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका जयश्री कुलकर्णी, अजय मालू, दिपक बाविस्कर, मनोज कुलकर्णी, लीलाधर कुलकर्णी यांनी अथर्वचे कौतुक केले.