बॅडमिंटन स्पर्धेत स्टार खेळाडू समोरासमोर येणार?

0

नवी दिल्ली । भारतीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेला 28 मार्च पासून सुरू होणार आहे. यास्पर्धेत अनेक दिग्गंज खेळाडू सहभागी होणार आहे.या स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीत पी.व्ही.सिंधू व सायना नेहवाल हे भारतीय स्टार बॅडमिंटन खेळाडू आमनेसामने येण्याची शक्यता आहे.जर या दोन्ही मानांकीत खेळाडूत उपांत्यपूर्व सामना रंगला तर कोण विजयी होणार याकडे सर्व देशाचे लक्ष्य लागण्याची शक्यता आहे.या दोन्ही खेळाडूनी ऑलिम्पिकपदक विजेता असून त्यांनी आपल्या खेळामुळे अनेक दिग्गंजाना पराभवाचे तोड पहावयास लावले आहे.

अनेक दिग्गज खेळाडू सहभागी होणार
भारतीय स्टार बॅडमिंटन पटू पी.व्ही.सिंधू व सायना नेहवाल यांनी ऑलिम्पिकपदक जिकले आहे. त्या आगामी सुरू होणार्‍या भारतीय खुल्या बॅडमिटन स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरती समोरासमोर येण्याची शक्यता आहे.सिरी फोर्ट क्रीडा संकुलात होणार्‍या या स्पर्धेतील पहिल्या फेरीत ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती सिंधूपुढे सिंगापूरच्या झियाओयू लिआंगचे आव्हान असेल. त्यानंतर दुसर्‍या फेरीत तिला जपानच्या सयाना कावाकामीशी झुंज द्यावी लागणार आहे. सहाव्या मानांकित सायनाला पहिल्या सामन्यात चायनीज तैपेईच्या चिआ हिसिनलीबरोबर लढत द्यावी लागेल. त्यानंतर तिला थायलंडच्या पोर्नपावी चोचूवोंगचे आव्हान असण्याची शक्यता आहे. जानेवारीत मलेशियन मास्टर्स स्पर्धेतील अंतिम लढतीत सायनाने चोचूवोंगला हरवले होते. सायना व सिंधू यांच्यात 2014मध्ये सय्यद मोदी चषक स्पर्धेत गाठ पडली होती. त्या वेळी सायनाने दोन गेम्समध्ये विजय मिळवला होता.