बॅण्डवर थिरकताना तोल जावून पडल्याने किनगावच्या तरुणाचा मृत्यू

0

यावल- तालुक्यातील किनगाव येथे संदलच्या मिरवणुकीत बॅण्डवर थिरकताना तोल जावून पडल्याने चेतन शरद पाटील (28) हा तरुण सोमवारी रात्री जखमी झाला होता. डोक्याला दुखापत झाली व रक्तस्त्रावही झाला मात्र रात्र झाल्याने मंगळवारी सकाळी दवाखान्यात जाईल, असे सांगून तो झोपला मात्र सकाळी पत्नीने त्यास उठवले असता तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. या प्रकारामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. मृत तरुणाच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा असा परीवार आहे. हा तरुण गावातील एका किराणा दुकानावर मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वार्ह चालवायचा. त्याच्यावर शोकाकूल वातावणात मंगळवारी दुपारी दोन वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.