चाळीसगाव- शहरातील बेकायदा बॅनर हटवावे, या मागणीसाठी जनआंदोलन खानदेश विभागातर्फे आज नगरपालिका परिसरात धरणे आंदोलन करण्यात. 26 मार्च रोजी यासंदर्भात निवेदन देऊन धरणे आंदोलनाचा इशारा जनआंदोलनतर्फे देण्यात आला होता. त्यानुसार हे आंदोलन करण्यात आले होते. दरम्यान, बॅनर हटविण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन मुख्याधिकार्यांनी पत्राद्वारे दिले आहे.