बॅाम्बस्फोटातील आरोपी निवडणूक रिंगणात

0

मुंबई । मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी निवृत्त मेजर रमेश उपाध्याय उत्तर प्रदेश येथील निवडणूक लढण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे. याआधीही 2012 मध्ये उत्तर प्रदेश येथे झालेली निवडणूक लढवण्यासाठी न्यायालयानं उपाध्यायला परवानगी दिली होती. आखिल भारत हिंदू महासभा पक्षाकडून त्याने दोन मतदार संघातून निवडणूक अर्ज भरला होता. दोन्ही ठिकाणी तो पराभूत झाला. विशेष एनआयए न्यायालयाने परवानगी दिली.

तात्पूरता जामीन अर्जावर होणार सुनावणी
यावर्षी होणारी निवडणूक लढवण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती करणारा अर्ज उपाध्यायने न्यायालयात केला होता. या अर्जाचे प्रत्युत्तर सादर करण्याचे आदेश न्यायालयाने एनआयएनला दिले होते. या अर्जाला विरोध नाही, असे एनआयएने न्यायालयाला सांगितले. त्याची नोंद करून घेत न्यायालयाने उपाध्यायला निवडणूक लढवण्यास परवागनी दिली.निवडणुकीच्या प्रचारासाठी 4 फेब्रुवारी ते 4 मार्चपर्यंत तात्पूरता जामीन मंजूर करावा, अशी विनंती करणारा अर्जही उपाध्यायने न्यायालयात केला. त्या अर्जावर येत्या सोमवारी एनआयए न्यायालयात सुनावणी होणार आहे.