बेंडाळे चौकात तरूणाला जमावाकडून मारहाण

0

शनिपेठ पोलिसांची वेळीच धाव
जळगाव । शहरातील पुष्पलता बेंडाळे चौकात दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास दुचाकीला कट लागल्याच्या कारणावरून दुचाकीस्वारांमध्ये वाद होऊन शिवीगाळ करण्यात आली. या वादावरून एकाला भरचौकात तरूणांनाच्या जमावाने चांगला चोप दिला. हा होणारा प्रकार बघ्याची भुमिका करणार्‍या एका 20 वर्षीय तरूणालादेखील विनाकारण त्याच जमावातील तरूणांकडून मारहाण करण्यात आली. दरम्यान हा वाद चिघडल्याने चौकातील पेट्रोलपंपासमोर तणावाचे वातावरण निर्माण होवून पळापळ सुरू झाली होती. वेळीच शनिपेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून जमावाला पांगविण्यात आले. त्यावेळी चौकात पाईपलाईच्या दुरूस्तीचे काम सुरू असल्याने दोन्ही बाजूस रहदारी चांगलीच खोळंबली होती.

प्रत्यक्षदर्शीकडून मिळालेली माहिती अशी की, पप्पू उर्फ विशाल पाटील (रा.कांचन नगर) हा दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास दुचाकीचा हप्ता बँकेत भरण्यासाठी पांडे चौकात जात असतांना समोरून येणार्‍या दुचाकीने त्याला धडक दिली. यात विशाल खाली पडला. यावरून दोन्ही दुचाकीधारकांमध्ये वाद झाला. वादाचे रूपांतर ’हमरी तुमरी‘वर आले होते. त्यानंतर धडक देण्यार्‍या दुचाकीधारकाने मोबाईवरून तरूणांना झालेल्या घटनास्थळी बोलविले. त्यानंतर तो काही वेळा तरूणांचा जमाव घटनास्थळी असल्यानंतर गोंधळ झाला. त्यानंतर विशाल पाटील याला तरूणांनी चांगलेच बदडले.

पळापळ सुरू
बेंडाळे चौकात हाणामारी झाल्यानंतर पुन्हा चौकातील पेट्रोल पंपासमोर पुन्हा विशाल ला मारहाण करण्यात आली. यानंतर नंतर चांगलाच जमाव जमल्याने पळापळ सुरू झाली. विशाल हा कसा बसा जीव वाचवित जमावातून सुटका करत पळत सुटला. त्याच्या मागे जमावाने पळ काढला. त्यामुळे संपूर्ण घडलेल्या प्रकारामुळे चौकात चांगलाच गोंधळ निर्माण होऊन तणाव निर्माण झाले होते.

जमावात पळणार्‍या एकाला मारहाण
हरिओम नगरातील अमोल दिपील साळुंखे हा तरूण ट्रान्सपोर्ट नगरात असलेल्या त्याच्या सोडावर कामासाठी जात होता. मात्र, चौकात हाणामारी सुरू असल्याचे पाहून ते पाहण्यासाठी तेथे थांबला. परंतू, काही वेळातच पळापळ सुरू झाल्याने जमावाने अमोल याला पकडून काहीही कारण नसताना मारहाण केली. यात त्याचे कपडे फाटले गेले व हाता व मानेला गंभीर दुखापत झाली. तर एका रिक्षाचालकाने त्याला लाथ मारल्याने तो खाली कोसळला.

पोलिसांची घटनास्थळी धाव
बेंडाळे चौकात हाणामारी सुरू असल्याची माहिती मिळताच शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रविण वाडीले यांच्यासह डिबी कर्मचार्‍यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. यानंतर जमलेला जमाव पांगविला. घडलेल्या प्रकाराची माहिती घेत वाडीले यांनी पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही कॅमेरे तपासेले मात्र कॅमेरे बंद असल्यामुळे काहीही मिळून आले नाही. अखेर डिवायएसपी सचिन सांगळे यांनी घटनास्थळी येऊन घटनेची माहिती घेत पुन्हा जमलेला जमाव पांगविला. त्यानंतर पेट्रोलपंपावर असलेली विशालची दुचाकी पोलिसांनी जप्त केली.