बेंडाळे महाविद्यालयाच्या विद्यार्थीनींना रिक्षाचालकाकडून बेदम मारहाण

0

पोलिसात तक्रार केल्यावर विद्यार्थीनीच्या घरी जावून दांगडो

जळगाव : माझ्या मैत्रिणीला भडकावते, या संशयावरुन रिक्षाचालक तरुणाने बेंडाळे महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थीनींना बेदम मारहाण करण्याची घटना 14 रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली. या तरुणाने एकीला शिवीगाळ करत चापटा बुक्क्यांनी मारहाण केली, तर तिला सोडविण्यास आलेल्या मैत्रिणीचा गळा दाबल्याचा धक्कादायक प्रकार घडला. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसात तरुणाविरोधात अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे पोलिसात तक्रार दिली म्हणून विद्यार्थीनीच्या घरी जावून रिक्षाचालकाने तिच्यासह कुटुंबियांना जीवे मारण्याची तसेच खोटे गुन्हा दाखल करण्याची धमकी देत दांगडोही केला. या दोन्ही घटनांनंतर दहशतीत असलेल्या विद्यार्थीनीसह तिचे कुटुंबियांकडून संशयिताला अटक करण्याची मागणी केली जात असताना त्याकडे मात्र पोलिसांकडून सोयीस्कर दुर्लक्ष जात केले जात आहे. पोलीस गंभीर दुर्घटनेची तर वाट पहात नाही ना? असाही संतप्त सवाल कुटुंबियांनी उपस्थित केला आहे.

पिडीत विद्यार्थींनी शहरातील बेंडाळे महाविद्यालयात इयत्ता 12 वी (इलेक्ट्रॉनीक्स)चे शिक्षण घेत आहे. सोमवारी तिचा इंग्रजीचा पेपर होता. पेपर संपल्यावर दुपारी अडीच वाजता ति तिच्या मैत्रीणीसोबत घरी जात असतांना, महाविद्यालयाच्या बाहेरच जय राजेंद्र कोळी ऊर्फ पिंट्याने रा.समतानगर या रिक्षाचालकाने पिडीतेला मारहाण केली. लिा तिची मैत्रीण तिला सोडवत असतांना जयने तिचेही केसं धरत गळा दाबुन तिलाही मारहाण केली. पिडीतेला सायंकाळी कुटुंबियांना प्रकार सांगितला. त्यानुसार जिल्हापेठ पोलिसात जय कोळी विरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

संशयित तरुणाकडून स्वतः घरात तोडफोड
पोलिसांत तक्रार दिल्याचे माहिती पडल्यावर जय कोळी याने मध्यरात्री 12 वाजता दारुच्या नशेत स्वत:च्या घराचा टिव्ही व इतर साहित्य फेकाफेक केली. यानंतर पिडीत विद्यार्थीनीच्या घरी जावून तिला शिवीगाळ व धमकी देवून त्याच्याविरोधात उलट रामानंदनगर पोलिसात तक्रार दिली. एवढेच नाहीतर पिडीतेच्या घरावर हल्ला करुन तिच्या आई-वडीलांना मारहाण केली. त्यामुळे पिडीत विद्यार्थीनीसह कुटुंबिय भितीखाली असून त्याला अटक करावी अशी मागणी होत आहे.