बीड : राष्ट्रवादीचे नेते नवनियुक्त सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांचा राजकीय प्रवास आणि राजकारणातील अनुभव कथन केले. काल त्यांनी भगवानगडावर जाऊन भगवान बाबांचे दर्शन घेतले. दरम्यान त्यांनी आज राजकी अनुभव मांडले. बेईमान, गद्दार म्हणून कितीतरी वर्ष हिणवले गेले. बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रात माझी गद्दार म्हणून प्रतिमा उभी केली गेली. मात्र उशिरा का होईना न्याय मिळाले अशी भावना धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली. उशिरा होईना सत्याचा विजय होतो हे सिद्ध झाले, असे भावनिक उद्गार मुंडे यांनी काढले. तसेच यावेळी धनंजय मुंडे यांनी स्वर्गीय मुंडे साहेबांनी भावाशी म्हणजेच अण्णांशी रक्ताचे नाते तोडण्याचा निर्णय जाहीर केला. त्यावेळी मग मी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला असे सांगितले.
मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा धनंजय मुंडे हे परळीला जात आहेत. आज शुक्रवारी त्यांचा परळीमध्ये भव्य नागरी सत्कार होणार आहे.