चंद्रपूर : शेतकर्यांशी बेईमान करणार्या सरकारला मतांनी मारा किंवा वेळप्रसंगी तलवारीने छाटा, असे वादग्रस्त विधान आमदार बच्चू कडू यांनी राजुरा येथे केले. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. राजुरा तालुक्यात संपूर्ण कर्जमुक्ती परिषदेत बोलताना कडू यांनी हे वक्तव्य केले. रघुनाथदादा पाटील, डॉ. अजित नवले यांच्यासह मोठ्यासंख्येने शेतकरी परिषदेला उपस्थित होते. राज्यात नक्षलवाद्यांची संख्या कमी झाली, ही चांगली बाब आहे. मात्र, शेतकर्यांना नक्षलवादाचा मार्ग पत्करावा लागू नये, त्याकरता सरकारने प्रयत्न करायला हवेत, असेही आमदार कडू म्हणाले.