भुसावळ । तालुक्यातील साकरी शिवारात राष्ट्रीर महामार्ग सहावरील साईलीला ढाब्याजवळ बेकायदा दारूची विक्री करताना संजर सुरेंद्र भिरुड (33, रा.फेकरी) यास अटक करण्यात आली. आरोपीच्या ताब्यातून सहा हजार 240 रुपये किंमतीची दारू जप्त करण्यात आली.
सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई ईआरटी पथकातील हवालदार राजेंद्र साळुखे, बंटी सैंदाणे, सुनील थोरात, साहील तडवी, प्रेमचंद सपकाळे, कृष्णा देशमुख, नीलेश बाविस्कर, दीपक जाधव, सोपान पाटील, राहुल चौधरी आदींनी केली.