बेकायदा बांधकाम पाडले

0

पिंपरी-चिंचवड । महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने शुक्रवारी काळभोरनगर, मोहननगर येथे चालू असलेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली.

या कारवाईत एक आरसीसी बांधकाम (क्षेत्रफळ 320 चौरस फुट) पाडण्यात आले. कार्यकारी उपअभियंता मकरंद निकम यांच्या मार्गदर्शनाखाली कनिष्ठ अभियंता केशव फुटाणे, बीट निरीक्षक यांच्या पथकाने ही कारवाई केली. एक जेसीबी, सात मजूर यांच्या सहकार्याने ही कारवाई करण्यात आली. कारवाई दरम्यान पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता.