बेकायदेशीरपणे जमिनीवर ताबा मिळवल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा

0
हिंजवडी : जागेचा व्यवहार झाल्यानंतर नवीन मालकाला जागेत येण्यापासून मज्जाव करत जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 17 ते 23 डिसेंबर या कालावधीत पुनावळे माळवाडी येथे घडली. वैशाली भाऊसाहेब लोणकर (वय 46, रा. गणेशनगर, थेरगाव) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार शंकर बाबुराव दर्शिले, प्रभाकर शंकर दर्शिले, विक्रम शंकर दर्शिले (सर्व रा. माळवाडी, पुनावळे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माळवाडी येथे सर्व्हे नंबर 41/27 मध्ये 17 आर जमीन आहे. त्यातील 3 गुंठे जमीन फिर्यादी वैशाली यांनी खरेदी केली. रजिस्टर खरेदीखत केल्याने त्या 3 गुंठे जागेचा 7/12 वैशाली लोणकर यांच्या नावावर झाला आहे. तरीही आरोपींनी वैशाली यांना त्या जागेवर येण्यास मज्जाव केला. तसेच शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. बेकायदेशीरपणे वैशाली यांच्या जागेवर तारेचे कंपाउंड केले. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.