शिरपूर । नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा येथून मालेगाव येथे बेकायदेशीररित्या गोवंशाची कातडे घेवून जाणर्या वाहनास शुक्रवार 30 जून रोजी सायंकाळी शिरपूर शहरातील रिक्रिएशन गार्डनजवळ पकडले होते. या कारवाईत वाहनसह 3 लाख 70 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्याज आला असून चालकाला अटक करण्यात आली आहे. शुक्रवार 30 जून रोजी संध्याकाळी 5.30 ते 6 वाजेच्या दरम्यान घटना घडली. तळोदा येथून मालेगाव येथे गोवंशाचे 140 कातडे बेकायदेशीरितया विक्रीसाठी गाडी क्र. एमएच 13-1839ने चालक शकील कलीम शेख रा. मालेगाव हा घेवून जात असतांना पकडण्यात आले होते. या गाडीत गोवंशाचे कातडे असल्यामुळे मार्गांवरून जाणार्या वाहनधारकांना दुर्गंधी येत होती. तसेच संसर्गजन्य आजार पसरविल्याप्रकरणी चालकास अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी 3 लाखाची गाडी व 70 हजारांचे गोवंश कातडे मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत हवालदार स्वप्नील बंगार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शकील शेख विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.