तहसीलदारांनी केली पाहणी
तळेगाव दाभाडे : बेगडेवाडी रेल्वे स्थानकामध्ये रेल्वेरुळा वरून रेल्वेचा डब्बा घसरल्याचा निरोप आला व प्रशासनाची जोरदार धावपळ झाली. प्रत्यक्ष पाहता आपत्कालीन घटनेच्या प्रसंगी प्रशासन सज्ज असावे म्हणून केलेला प्रयोग होता, असे निदर्शनास आले. याबाबतची हकीकत अशी की, सकाळी अकरा वाजता तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक भानुदास जाधव यांच्या समवेत पत्रकार परिषद सुरु असताना अचानक मावळचे तहसीलदार रणजीत देसाई यांचेकडून बेगडेवाडी रेल्वे स्थानकामध्ये रेल्वेरुळा रेल्वेचा डब्बा घसरल्याचा निरोप आला. माहिती मिळताच जाधव व त्यांच्या सहकार्यांनी घटनास्थळी जाण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या पाठोपाठ उपस्थित पत्रकार देखील त्या ठिकाणी जाण्यास निघाले. बेगडेवाडी रेल्वे स्थानक पास केल्यावर शेलारवाडी नजीक बेगडेवाडीचा रेल्वे यार्ड आहे. त्या ठिकाणी फार मोठी गर्दी झालेली दिसत होती. प्रत्यक्ष घटनास्थळावर जाईपर्यंत काय घडले असेल याचा अंदाज करता येत नव्हता.
हे देखील वाचा
प्रशासनासाठी केला प्रयोग
प्रत्यक्ष घटनास्थळावर रेल्वे खात्यातील मुख्य सवरक्षण अधिकारी प्रकाश भूतानि, एडीआरएम प्रफुल्लचंद्र, वरिष्ठ मंडळ अधिकारी आर. व्ही. नगराळे, टीम प्रमुख शिवकुमार,तळेगाव प्राथमिक आरोग्य केडरचे डॉ.पी.एच.फोले तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भानुदास जाधव या सर्व वरीष्टाच्या समवेत त्यांचे सहकारी घटनास्थळावर कार्यवाही साठी उपस्थित होते. घटनास्थळी प्रत्यक्ष पाहणी करता बेगडेवाडी रेल्वे यार्ड मध्ये रेल्वे रुळावरून एक रेल्वेचा डब्बा घसरला असून त्याला परत रुळावर आणण्यासाठी मोठी क्रेनचा वापर केला जात होता. रेल्वे यार्डमध्ये डब्बा घसरल्याने त्यामध्ये प्रवासी नव्हते. पण मिळालेली माहिती त्यामुळे प्रशासन, नागरिक यांची झालेली धावपळ मोठी नाट्यमय होती. शेवटी खोलवर वरिष्ठाकडे खुलासा केला असता आपत्कालीन घटनेच्या प्रसंगी प्रशासन व यंत्रणा सज्ज असावी म्हणून केलेला प्रयोग होता.