बेटावद-नरडाणा रस्ता ‘जैसे थे’ लाखो रुपये पाण्यात

0

बेटावद । शिंदखेडा तालुक्यातील बेटावद नरडाणा होळ या राज्य मार्ग क्र 6ची पुन्हा दुर्दशा झाल्याचे दिसत असून गेल्या महिन्यात या मार्गावर थातूरमाथुर खड्डे बुजविले गेले त्यामुळे शासनाचे लाखो रुपये पाण्यात गेल्याची प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरीकांमधून चर्चिली जात आहे. याबाबत वृत्त असे की, बेटावद गावावरुन नागपूर अंकलेश्‍वर हा राज्य मार्ग क्र. 6 हा बेटावद नरडाणा होळ शिंदखेडा दोंडाईचा शहादा असा जाऊन तो गुजरात राज्यातील अंकलेश्‍वरला जातो. परंतू बेटावद पांझरा पुला पासून या मार्गाची दुर्दशेला सुरुवात होउन वारुड नरडाणा तसेच होळ या गावापर्यंत ही दुर्दशा दिसून येते. त्यामुळे राज्याचे बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटलानी राज्यातील सर्व रस्ते खंडेमुक्त करण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे सा.बा.विभागाने गेल्या महिन्यात या रस्त्यावरील खड्डे थातूरमाथूर बुजविले, परंतू पूर्वीसारखेच खड्डे पुन्हा पांझरा पुलापासून दिसण्यास सुरुवात झालेली आहे. त्यामुळे शासनाचे लाखो रुपये पाण्यात गेल्याचे ग्रामस्थांमधुन चर्चिले जात आहे.

फक्त डागडुगीने भागविताहेत काम
वास्तविक खड्डेमुक्तीची घोषणा या परिसरासाठी अपवाद ठरलेली आहे. बेटावद नरडाणा होळ हा राज्य मार्ग असून या मार्गाचे संपूर्ण नुतिनीकरण करणे अत्यावश्यक असताना फक्त डागडुगीने काम भागविण्यात आले. या मार्गाची इतकी दुर्दशा झालेली होती की बेटावद पांझरा पुलापासून वारुड नरडाणा होळपर्यंत खड्डेच खड्डे पडलेले होते. त्यामुळे वाहने कसी व कुठल्या साईडने चालवावी हा प्रश्‍न वाहन चालकांना पडतो. वास्तविक नुकतेच खड्डे बुजविव्यात आले परंतु ते पुन्हा जैसे थे झाले. त्यामुळे सा.बा. शिंदखेडा यांनी तात्काळ बेटावद वारूड होळ यापूर्ण मार्गाचे डांबरी करणकरावे अन्यथा येथील वाहन चालक बांधकाम मंत्री ना. चंद्रकांत पाटील तसेच राज्याचे पर्यटनमंत्री ना.जयकुमार रावल यांच्याकडे आपली कैफियत पुराव्यानिशी मांडणार असत्याचे बोलले जात आहे.