बेटावद येथे ताडी वाहतूक करताना एकास अटक

0

दोन आरोपी फरार; ९७५ रुपयांची ताडी जप्त

बेटावद । बेटावद- मुडावद या रस्त्यावरील वीज मंडळाच्या कार्यालया शेजारी रविंद्र जानकीराम कापडणे उर्फ बाबा हा त्याच्या टाटा मॅजीक रिक्षा क्रमांक एमएच१८-डब्ल्यू ८९८१ मधून विना परवानगी चोरटी ताडी विक्रीसाठी नेत होता. प्लॅस्टिकच्या ड्रममधून प्रत्येक ३५ लिटरप्रमाणे ५ ड्रम १७५ लिटर ताडीची वाहतुक करीत होता. रात्री ९ च्या दरम्यान पोलिसांना पाहून आरोपी सागर व अनिल वडार हे पळून जाण्यात यशस्वी झाले. परंतू पोलिसांनी वाहन जप्त करुन रविंद्र कापडणेला अटक केली.

फरार आरोपींचा शोध
पाच ड्रममध्ये भरलेली ९७५ रुपयाची तोडी पोलिसांनी जप्त केली. फरार आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत. याबाबत पो.कॉ.योगेश पाटील यांनी नरडाणा पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली. सहाय्यक फौजदार फुलपगारे, पो.कॉ.सतिश फुलपगारे, पो.कॉ.योगेश भरत पाटील, पो.कॉ.चंद्रप्रकाश कांबळी आदींनी ही कारवाई केली. पुढील तपास पो.हे.कॉ.बडगुजर हे करीत आहेत.