बेटावद येथे महावितरणतर्फे ग्राहक तक्रार निवारण दिन

0

बेटावद। शिंदखेडा तालुक्यातील बेटावद येथील म.रा.वि.वि.कंपनीतर्फे ग्राहक तक्रार निवारण व संवाद दिन साजरा करण्यात आला. धुळे शहर तथा ग्रामीण विभागातर्फे प्रत्येक उपविभागीय कार्यालय व त्या कार्यालयांतर्गत येणार्‍या प्रत्येक शाखेत ग्राहकांच्या हितासाठी ग्राहक तक्रार निवारण व संवाद दिन साजरा केला जात असून त्यानिमित्ताने बेटावद शाखेत वीज ग्राहकांच्या अडीअडचणी व त्यांच्याशी संवाद नरडाणा उपविभागाचे एस.डी.ओ.पी.एम.पाटील व बेटावद शाखाप्रमुख के.बी.सनेर यांनी ग्राहकांच्या अडीअडचणी सोडविल्या.

यावेळी नरडाणा उपविभागाचे सुयोग जैन यांच्यासह बेटावद शाखेतील कर्मचारी उपस्थित होते.