चिंबळी : जागतिक महिला दिना निमित्त मरकळ(ता.खेड)येथे ग्रामपंचायतीच्या व एसओएस संस्था तसेच पंचायत समिती खेड एकात्मिक बाल विकास योजना अतंर्गत चर्होली खु.बिट यांच्या सयुक्त विद्यमानाने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने बेटी बचायो उपक्रम आयोजित करण्यात आला.
जि.प.सदस्या दिपाली काळे व सरपंच मंगल खादंवे यांच्या हस्ते क्रांती ज्योति सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार हार अर्पण करून डॉ पुनम राऊत यांनी आरोग्य विषयी महिलांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी 180 महिलांनी सहभाग घेतला असल्याचे एसओएस संस्थेच्या स्वाती मदने यांनी सागिंतले. याप्रसंगी ग्रा.पं सदस्या स्वाती लोखंडे, तृप्ती लोखंडे, अनिता लोखंडे, पंचायत समितीच्या अंगणवाडी पर्यवेसिका गायत्री टिकले, अंगणवाडी सेविका अंकिता लोखंडे, आशा लोखंडे, शालन टाकळकर, वंदना घेनंद, शकिला इमानदार, माधुरी शेजवळ, सुनंदा कदम आदि शिक्षिकांचा गुलाब पुष्प देऊन गुणगौरव करण्यात आला.