शहादा। भोईराज युवा मंच शहादातर्फे बेटी बचाओ बेटी पढाओ उपक्रम राबविण्यात येतो.भोईराज युवा मंच ने सुरू केलेला बेटी बचाओ उपक्रम ज्या घरात मुलगी जन्माला आली.त्या घरातील संपूर्ण परिवाराचे सत्कार करायचे.आणि त्या परिवाराला मुलीचे महत्व पटवून द्यायचे.
हा उपक्रम त्यांनी 6 जानेवारी 2017 पासून सुरुवात केलेला आहे.तरी आता पर्यंत 10 परिवाराचे सत्कार करण्यात आले आहे. या उपक्रमामागे त्यांचा एकच हेतू आहे की मुलीच्या जन्माचे स्वागत सर्वांनी करायलाच पाहिजे.या उपक्रमात प्रत्येक सत्कारला श्री.जितेंद्र वाडीले यांचा कडून 101 रुपये देणगी देण्यात येते.पुष्पगुच्छ व मिठाई वाटण्यात येते. भोई समाजात ज्या ज्या घरी मुलगी जन्माला आली. त्यांच्या व त्यांच्या पूर्ण परिवाराचा सत्कार करायचा असा त्याचा उपक्रम आहे.