‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ बाबत जनजागृती

0

जळगाव । आज देशभर मुलीनचा जन्मदर घटत चालला आहे. समाजात अनेकाना मुलगी नकोशी झाली आहे. वंशाला दिवा हवा म्हणुन मुलगाच हवा ही मानसिकता आज सर्वत्र निर्माण झाली आहे. या विषयावर प्रबोधन व्हावे या उद्वेशाने प्रविण पाटील फाऊंडेशनतर्फे जनजागृती करणारे पोस्टर व स्टीकर तयार करण्यात आली. त्याचे प्रमोशन शालेय विद्यार्थीनींच्या हस्ते करण्यात आले. निकिती सोनवणे, ममता पाटील, पुजा फाळके, रूकसारबी शेख, मुस्कान शेख, अरुणा सोनवणे या विदर्यार्थीनी उपस्थीत होत्या.

यांचे सहकार्य
वर्षभर ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या उपक्रमांंतर्गत विविध कार्यक्रम व स्पर्धा घेऊन जनजागृती केली जाणार आहे. या उपक्रमासाठी प्रविण पाटील, मयुर पाटील, अ‍ॅड.स्वाती निकम, रूपाली वाघ, सविता बोरसे, प्रियंका पाटील, फिरोज शेख यांचे सहकार्य लाभत आहेत.