नंदुरबार । बेटी बचाव दौड हा एक स्तुत्य उपक्रम आहे. तसेच नंदुरबार शहरात एक स्वच्छता दौडही घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी यांनी केले. ते येथील आयोजित जागतिक महिला दिनानिमित्त बेटी बचाव दौड प्रसंगी बोलत होते. स्पर्धेत 482 स्पर्धकांनी भाग घेतला होता.नंदुरबार जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशन व लायन्स क्लब नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त बेटी बचाव दौडचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेची सुरुवात जिल्हाधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी यांनी हिरवी झेेंडी दाखवून केली.
यावेळी कार्यक्रमास पोलीस अधीक्षक राजेंद्र डहाळे, प्रकल्प अधिकारी निमा अरोरा, जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड, लायन्स क्लबचे अध्यक्ष आनंद रघुवंशी, सचिव राहुल पाटील, लायनेस क्लबच्या अध्यक्षा हिना रघुवंशी, प्राचार्य पुष्पेंद्र रघुवंशी, पर्यवेक्षक अरुण हजारी, अनिल पाटील, प्राचार्य शिवाजी पाटील, नगरसेवक विलास रघुवंशी, स्पर्धा संयोजक मयुर ठाकरे, जितेंद्र पगारे, पंकज पाठक, प्रा.मनोज परदेशी, मुख्याध्यापक सुनिल पाटील, पोलीस उपनिरीक्षक राहुल शेजवळ, महेश भट, प्रा.सुनिल पाटील आदी उपस्थित होते.