बेडकीपाडा शिवारात प्रदुषण

0

नवापूर । नवापूर तालुक्यातील बेडकीपाडा(बंधारफळी) शिवारात टायरपासून ओईल बनविणे कारखाना सुरु असून त्यापासून जनतेच्या व परिसरातील शेतीला नुकसान होत असल्याने सदर कारखाने त्वरित बंद होणे बाबत चे निवेदन आज प्रभारी तहसिलदार राजेंद्र नजन यांना देण्रात आले. बेडकीपाडा(बंधारफळी) शिवारात चोखावाला वसाहतीला लागून असलेल्या वसाहतीत जुन्या टायर वर प्रोसेस करुन ऑईलतयार करण्याचे तीन कारखाने सुरु आहेत.यामुळे मोठया प्रमाणात वायू प्रदूषण व जनतेचा आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.

..अन्यथा टोकाची भूमिका
यापूर्वी परिसरातील नागरिकांनी व राजकीय पक्षांकडून अनेक वेळा निवेदन दिले असून प्रशासनाकडुन आज पावेतो ठोस कार्यवाही झालेली नाही.त्यामुळे निवेदन देऊ पण कारखाना बंद झाला नाही.तरी पुढची आमची टोकाची भूमिका राहील याची संपुर्ण जबाबदारी शासनाची राहील असे निवेदना मध्ये म्हटले आहे.निवेदनावर पं.स उपसभापती दिलीप गावीत,पं.स सदस्य जालमसिंग गावीत,विरोधी पक्षनेता नरेंद्र नगराळे,सलीम मन्सुरी,राजु गावीत,ठाकुर मावची,नरेश धोडीया,जीवन धोडीया,राहुल धोडीया,संदिप राठोड,हेमंत धोडीया,राजू कोकणी,जिग्नेश पटेल,सुधीर पटेल,निलेश वसावा,अशा असंख्य ग्रामस्थ यांचा सह्या आहेत.

अशी आहे सध्यस्थिती
संबंधित प्रदुषित पाणी जमिनीतील मुख्य स्ञोतमध्ये जावून मिसळत असते.व त्यामुळे जमिनीचे पाणी पूर्णत: दुषित होत आहे.तसेच सदर कारखान्याचा व्यवसाय हा गुजरात राज्यात मोठया प्रमाणात सुरु होता.परंतु सदर कारखानदारी मुळे जनतेच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.त्यातून निघणारा वायू पदार्थ उदा.कार्बन,मिथेनॉल- इथेनॉल डायक्लोराईड पासून वायू व पाणी प्रदूषणाचा विचार करुन गुजरात पोल्यूशन कंट्रोल बोर्डने दि 12 ऑक्टोबर 2011 रोजी सुरत जिल्हाातील 45 कारखाने बंदाचे आदेश दिले. त्यानंतर संपुर्ण गुजरात राज्यात ही कारखानदारी बंद करण्यात आली.त्यापासून निर्माण होणा-या कार्बन,मिथेनोल इथेनॉल-डायक्लोरेडपासुन कॅन्सर सारखे महाभयंकर रोग होण्याचे ही अलीकडे सिध्द झाले आहे.