बेपत्ता आईची चिमुकलीसह विहिरीत उडी मारून आत्महत्या

0

गडचिरोली । गुरूवारपासून बेपत्ता झालेल्या महिलेने 1 वर्षाच्या चिमुकलीसह विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आज सकाळी शहरातील लांझेंडा प्रभागात एका विहिरीत या मायलेकींचे मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याचे आढळून आले. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. शुभांगी वैरागडे (वय 30) व चिमुकली श्रावी वैरागडे (वय 1 वर्ष) अशी मृत मायलेकींची नावे आहेत.

बेपत्ता झाल्याची केली होती तक्रार
शहरातील इंदिरानगर प्रभागात संदीप वैरागडे हे त्यांची पत्नी शुभांगी व मुलगी श्रावी राहत होते. मात्र अचानक शुभांगी आणि चिमुकली श्रावी या दोघी गुरूवारी बेपत्ता झाल्या. शुभांगीचे पती व इतर नागरिकांनी त्यांचा शोध घेतला मात्र त्यांचा ठावठिकाणा लागला नाही. संबंधित महिलेच्या पतीने गडचिरोली पोलीस ठाण्यात पत्नी व मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. मात्र आज सकाळी या मायलेकीचा मृत्यू झाल्याचे समजताच पोलिसांनी घटनास्थळावरून दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले. दरम्यान महिलेचे चिमुकलीसह आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही. याबाबत गडचिरोली पोलीस अधिक तपास करत आहेत.