बेपत्ता एसीपी चाफेकर सापडले

0

नवी मुंबई : सहाय्यक पोलीस आयुक्त राजकुमार चाफेकर अखेर सापडले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता असलेले चाफेकर मध्यप्रदेशमधील जबलपूरमध्ये असून ते तिथे कसे पोहोचले आणि का गेले, हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.नवी मुंबईतील आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस आयुक्त राजकुमार चाफेकर गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता होते. सीवूड्स ईस्टेट येथील घरातून ते शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास निघाले होते. मात्र, यानंतर त्यांच्याशी संपर्क होऊ शकत नव्हता. त्यांचा मोबाईलदेखील बंद येत होता. शनिवारी संध्याकाळपर्यंत चाफेकर कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, ठावठिकाणा समजत नसल्याने शेवटी त्यांनी एनआरआय पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी मिसिंगची तक्रार दाखल करुन घेत तपासाला सुरुवात केली. अखेर रविवारी सकाळी चाफेकर यांच्याशी संपर्क झाला. चाफेकर जबलपूर रेल्वे स्थानक परिसरात होते.