बेपत्ता व्यक्तीच्या शोधासाठी खोदली कबर

0
डीएनए अहवालानंतर पटणार त्या तरुणाची ओळख
भुसावळ- बोदवडमधील रवींद्र सुभाष ठाकरे (25) या बेपत्ता व्यक्तीचा गेल्या दिड वर्षांपासून कसून शोध सुरू असताना त्याचा तपास लागत नव्हता. या तरुणाचा पोलिसांनी ठिकठिकाणी शोध घेवूनही तपास लागलेला नव्हता तर गतवर्षी मार्च महिन्यात एका तरुणाचा रेल्वेतून पडून मृत्यू झाल्यानंतर ओळख न पटल्याने बेवारस दफनविधी करण्यात आला होता. मात्र हा मृतदेह ठाकरे याचाच असल्याचे बोलले जात आहे तर दुसरीकडे वरणगाव पोलिसांनाही एका प्रकरणात बेवारस ईसमाबाबत ओळख पटवायची असल्याने मृतदेहाची डीएनए चाचणी करायची असल्याने कबरीतून मृतदेह बाहेर काढण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले. भोगावती शिवारात दफनविधी करण्यात आलेला मृतदेह मंगळवारी प्रभारी तहसीलदार संजय तायडे यांच्या समक्ष बाहेर काढण्यात आला. या मृतदेहाची डीएनए टेस्ट केल्यानंतर तो मृतदेह रवींद्र ठाकरे यांचा की अन्य दुसर्‍या ईसमाचा याबाबत माहिती कळणार आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय परदेशी यांच्यासह कर्मचारी प्रसंगी उपस्थित होते.