बेफिकीर जळगावकरांचे करायचे काय? पोलिसांनाही प्रश्न

0

जळगाव – कोरोनाला अटकाव करण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन असतानाही बेफिकिरीने रस्त्यावर फिरणाऱ्या जळगावकरांचे करायचे तरी काय ? असा प्रश्न पोलिसांनाही पडला आहे.

लोकडाऊनमध्ये लोकांनी घरातच राहणे प्रशासनाला अपेक्षित आहे. गेले ३ दिवस त्यावर अंमल झाला पण नावीन्य संपले, भीती वाटेनाशी झाली आणि लोक शनिवारपासून पुन्हा रस्त्यावर दिसू लागले आहेत. शाहू नगर, नूतन मराठा कॉलेज, हौसिंग सोसायटी, प्रताप नगर, कोर्ट चौक या परिसरात पोलिसांचा राऊंड सुरू असतो. पोलीस आले की, लोक दुसरा रस्ता पकडतात पण ते गेल्यावर काही नागरिक बिनधास्तपणे रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. जर शहरात एकही कोरोनाचा रुग्ण नाही तर आम्हाला त्याची बाधा कशी होईल ? असा गैरसमज काहींनी करून घेतला आहे. पोलिसांनी अडवले तर काहीना काही कारणे सांगून असे लोक पुढे निघून जातात. त्यांच्यापुढे पोलीसही हतबल झाल्याचे दिसत आहे.