बेबी डॉल झाली आई

0

मुंबई । सनी आई बनली असून तिने एक मुलगी दत्तक घेतली आहे. सनी व तिचा पती डॅनिअल वेबर यांनी लातूरमधील 21 महिन्यांच्या निशा कौर वेबर या गोंडस मुलीला दत्तक घेतले आहे. नैसर्गिकरित्या आई होणं, गरोदर राहणे सध्या तरी माझ्यासाठी कठीण आहे. कारण, माझ्या आयुष्यात बरंच काही घडत आहे. परंतु, पुढं काय होईल कोण सांगू शकतो? कदाचित काही दिवसांनंतर माझ्या हातात बाळ पाहून तुम्हाला धक्का बसेल,’ असे सांगत तिने आई होण्याचे संकेत काही दिवसांपूर्वीच एका मुलाखतीत दिले होते. आता या निमित्ताने खर्‍या अर्थाने सनी ने आपल्या चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे. मला लहान मुलं खूप आवडतात. एकदा तर एक लहान मुल माझ्याकडे आल्यावर त्याच्या आईकडे पुन्हा जातच नव्हते, काय करावे कळत नव्हते असे शेअर केले.

पाहताच क्षणी पडले प्रेमात
’निशाला पाहताक्षणीच आम्ही तिच्या प्रेमात पडलो’ असे सनीने नमूद केले. आम्ही निशाला निवडले नाही, तिनेच आमची (पालक) निवड केली’ असेही तिने सांगितले. सध्या बॉलिवूडमधील स्टार्समंडळी सरोगसीच्या मदतीने पालक बनत आहेत. शाहरुख खान, करण जोहर, तुषार कपूर यांनी आधीच सरोगेसीचा मार्ग अवलंबला आहे. त्यांच्याप्रमाणेच सनीही सरोगसीचा मार्ग अवलंबणार असल्याची चर्चा होती. मात्र त्याऐवजी सनीने मूल दत्तक घेण्याचा मार्ग स्वीकारला.

प्रीती दत्तक घेण्यात पुढे
बॉलिवूडमध्ये प्रीती झिंटा मुळे दत्तक घेण्याच्या बाबतीत सगळ्यात पुढे असून 2009 साली आपल्या 34 व्या वाढदिवसादिवशी तिने एक, दोन नाही तर 34 अनाथ मुलीना ऋषिकेश येथून दत्तक घेतले होते. त्यांचे पालन पोषण आणि शिक्षण यांची संपूर्ण जबाबदारी याकडे ती स्वतः लक्ष देते. सुश्मिता सेन हेने आत्तापर्यंत दोन मुलीना दत्तक घेतले आहे.