बेबी पावडरमुळे कॅन्सर; अमेरिकेत जॉन्सन कंपनीला ४१ कोटी डॉलर दंड

0

लॉस एंजेलिस | येथील न्यायालयाने जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीला ४१.७ कोटी डॉलरची भरपाई एका महिलेला देण्याचे आदेश दिले आहेत. कंपनीची बेबी पावडर ओव्हरीचा कॅन्सर होण्यास कारणीभूत आहे, असा महिलचा दावा होता.

इव्हा इशेव्हेरिया अस या कॅलिफोर्नियातील महिलेचे नाव असून कंपनीच्या या पावडरशी संबंधित अमेरिकेतील खटल्यांमध्ये देण्यात आलेल्या भरपाईत ही रक्कम सर्वाधिक आहे. इव्हा १९५० पासून २०१६ पर्यंत जॉन्सनची बेबी पावडर वापरीत असे. तिला २००७ मध्ये कॅन्सर झाल्याचे लक्षात आले.

इव्हाच्या वकिलांनी म्हटलंय की जॉन्सला या निकालामुळे त्यांच्या उत्पादनांवर धोक्याचा इशारा यादीत आणखी एका बाबीचा समावेश करावा लागेल. कंपनीला गेली ३० वर्षे या धोक्याविषयी सांगितले पण त्यांनी ऐकले नाही असे वकील म्हणाले. जॉन्सन अँड जॉन्सनच्या प्रवक्त्यांनी न्यायालयाच्या निर्णयाविरोधात अपिल करणार असल्याची माहिती दिली आहे. बेबी पावडर सुरक्षित असल्याचे जॉन्सनचे म्हणणे आहे.