बेबो बनणार आर.जे

0

मुंबई : बॉलीवूडची बेबो करिना कपूर खान आता आर.जे. म्हणजेच रेडिओ जॉकीच्या भूमिकेत दिसणार आहे. करिना लवकरच तिचा स्वत:चा रेडिओ चॅट शो घेऊन चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. पहिल्या चॅट शोसाठी करिनानं चक्क सनी लिओनीला आमंत्रित केलं आहे.

यापूर्वी सनी आणि करिना कधीही एकत्र आल्या नव्हत्या त्यामुळे या दोघींच्या चाहत्यांसाठी हा वेगळा अनुभव ठरणार. करिनाचा रेडिओ शो येत्या डिसेंबरपासून सुरू होणार असल्याचं म्हटलं जातं आहे.