बेरोजगारांना मुद्रा योजनेचा लाभ द्यावा

0

भुसावळ। शहरातील सुशिक्षित बेरोजगार मुद्रा लोन योजनेपासून वंचित राहत आहे. त्यांना या योजनेचा लाभ मिळत नसल्यामुळे उद्योगधंदे उभारण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागतो त्यामुळे याप्रश्‍नी जिल्हाधिकार्‍यांनी लक्ष घालून वंचितांना न्याय मिळण्याची मागणी नगरसेवक रविंद्र सपकाळे यांनी केली. सपकाळे यांनी जिल्हाधिकारी निंबाळकर यांची भेट घेवून त्यांना निवेदन दिले.

शासनाने बेरोजगार युवकांना व्यवसाय स्थापनेच्या दृष्टीने पंतप्रधान मुद्रा लोन योजना संपूर्ण देशभरात सुरु केली. मात्र बेरोजगार युवक या योजनेचा लाभ मिळण्यासाठी बँकेत गेल्यास बँक व्यवस्थापक त्यांना टाळाटाळ करुन चुकीची माहिती देत असतात. यामुळे या तरुणांना रोजगारापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे याप्रकरणी लक्ष घालण्याची मागणी सपकाळे यांनी केली आहे. याप्रसंगी विक्रम वानखेडे, महेंद्र सपकाळे, विजय दाभाडे, राहुल साळवे, गौतम मोरे, विनोद नारखेडे, राजू सुरळकर, प्रमोद तायडे, अतुल वाघ, प्रविण मेघे, विनोद तायडे, आकाश इंगळे, अमोल मोरे, मनोज शिंपी, गणेश मिस्त्री, राजेश मेहेले, मिलिंद हिवाळे, अकबर गवळी, अजय सपकाळे आदी उपस्थित होते.