बेरोजगारीच्या नैराश्यातुन तरूणाची आत्महत्या

0

कळमसरे । येथील राजेंद्र शालिग्राम सूर्यवंशी (वय-45) याने बेरोजगारीमुळे जीवनाला कंटाळून 7 मार्च रोजी सकाळी विषारी द्रव्यसेवन करुन आत्महत्या केली. राजेंद्र सूर्यवंशी हा रंगकाम करीत असे मात्र ग्रामीण भागात नेहमी रंगकामाला काम मिळेलच असे नसल्याने पटेल ते काम तो करीत असे. सद्यस्थितित यावर्षी काम नसल्याने तो दीड महिन्यापासून घराबाहेर होता. काल रात्री उशिरा घरी आला होता.यात त्याने अंगणातच झोपुन राहीला होता. सकाळी त्याचा मुलगा उठवायला गेला असता राजेंद्रच्या तोंडाला फेस आलेला दिसला. तो बेशुद्ध अवस्थेत दिसताच त्याला तात्काळ अमळनेर येथील डॉ.अनिल शिंदे यांच्या दवाखान्यात हलविले असता, डॉ. यांनी त्याचा मृत्यु झाला असल्याचे सांगितले. यानंतर ग्रामीण रुग्णालयात डॉ. व्यवहारे यांनी शवविच्छेदन करण्यात आले. राजेंद्र हा रंगकामात हुशार होता. यावरच त्याची उपजीविका होती. काम नसले की मिळेल ते काम राजेंद्र करीत असे. त्याने मध्यंतरी गावात वृत्तपत्र वाटपाचे ही काम करायचा त्याची पत्नी कळमसरे येथील आरोग्य उपकेंद्रात आशा स्वयंसेविका म्हणून कामाला आहे. राजेंद्र याला पत्नी, दोन मूली व एक मुलगा, वृध्द आई-वडील असून तो मुलींच्या लग्नाच्या विवंचनेत असायचा. आई वडील अंथरुणावर खिलून असून हाताला काम नसल्याने उपजीविका भागविन्या बरोबर नेहमी कुटुंबांची परिस्थिती खालावत चालल्याने त्याने या नैराष्यातून आत्महत्या केली असल्याचेच बोलले जात आहे.दरम्यान मारवड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.