अमळनेर । तालुक्यातील कळमसरे येथील 50 वर्षीय व्यक्तीने 26 रोजी दुपारी 1.30 वाजता गावालागत शंभर मीटर अंतरावर खेडी रस्त्यावरील नाल्यात सायकलीवर जात अंगावर रॉकेल टाकुन स्वताला पेटवून घेतले. यात ते 70 ते 80 टक्के भाजल्याने पुढील उपचारासाठी धुळे येथे पाठविण्यात आले असता उपचारादरम्यांन् त्यांचा मृत्यु झाला. रामलाल वामन चौधरी असे मयत झालेल्या व्यक्तीने नाव आहे.
अशी घडली घटना
कळमसरे गावाजवलील खेडी रस्त्यावर हाकेच्या अंतरावर सायकलीवर सोबत बाटलीत रॉकेल घेऊन गेले होते. खेडी रस्त्यावर त्यांनी बाटलीतील रॉकेल अंगावर टाकून घेत स्वतःला पेटवून घेतले रामलाल चौधरी हे बर्याच दिवसापासून नैराश्येत असल्याची चर्चा होती. त्यातूनच त्यांनी जाळून घेतल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये ते डोक्यापासून कंबरेपर्यंत जळाले असल्यामुळे त्यांची ओळख पटत नव्हती. मात्र काही वेळानंतर गावातील ग्रामस्थानी त्याच्या जवळील असलेल्या सायकली वरुन ओळख पटली. मात्र गावातील ग्रामस्थानी 108 या रुग्ण वाहिकेस फोन लावून बोलावून घेतले. दरम्यान 70 ते 80 टक्के शरीर डोक्यापासून कंबरे पर्यंत भाग जळाल्याने धुळे येथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यु झाला. असून 108 रुग्णवाहिका तब्बल एक तास उशिरा आल्याने ग्रामस्थानी संताप व्यक्त केला. रविवारी त्यांच्या पार्थीवावर आत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पच्यात पत्नी एक मुलगा एक मुलगी असा परिवार होत. रामलाल चौधरी हे गावात व परिवारात मनमिळावू असल्याने मोठी शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे. मारवड पोलीसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.