बेरोजगारीला कंटाळून 30 वषीय युवकाची आत्महत्या

रावेर : रावेर शहरात बेरोजगारीला कंटाळुन 30 वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. रावेर शहरातील रहिवासी प्रमोद जगन्नाथ महाजन (30) याने बुधवारी रात्री मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या केल. प्रमोद हा विवाहि असून त्याला एक वर्षाचा मुलगा देखील आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. प्रमोद हा काही दिवसांपासून हाताला काम नसल्याने त्रस्त होता असे मयत प्रमोद यांचे मोठे बंधु गणेश महाजन यांनी सांगितले. याबाबत रावेर पोलिसात अकास्मात मृत्युची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलिस करीत आहे.