तालुक्यात आनंदोत्सव
चाळीसगाव । तालुक्यातील शेतकर्यांना वरदान ठरलेला बेलगंगा साखर कारखान्याची गेल्या जानेवारी महिन्यात खरेदी झाली व भूमीपुत्रांच्या अंबाजी ग्रुपच्या नावाने खरेदी खत नोंदविण्यात आले. उतार्यावर नाव लागण्याच्या हरकतीमूळे सहा सात महिने वाया गेले मात्र आम्ही डगमगीत झालो नाही आता कारखान्याच्या उतार्यावर अंबाजीचे नाव लागले आहे. आज देशात 72वा स्वतंत्रता दिन साजरा होत असताना प्रामाणिक उद्योग सुरू करून शेतकर्यांचा आर्थिक स्तर उंचविण्याचा आम्ही प्रयत्न करीत असून ही एक प्रकारे देशसेवाच आहे. मागील काळात कारखाना बंद असल्याने इतर पिकाकडे वळलेले तालुक्यातील शेतकर्यांना फारसा लाभ मिळाला नाही, त्याना पुन्हा उसाकडे वळवावे लागेल. एकरी साठ टन उसाचे पीक घेता येईल याचे नियोजन व रोजगार निर्मितीला प्राधान्य असल्याचे प्रतिपादन बेलगंगा कारखान्याचे चेअरमन चित्रसेन पाटील यांनी कारखान्याच्या आवारात ध्वजारोहण प्रसंगी व्यक्त केले खान्देशातील जेष्ठ उद्योगपती प्रविणभाई पटेल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव पाटील व यांच्यासह अधिकारी ,मुकादम,ऊस उत्पादक शेतकरी, कर्मचारी व अंबाजी ग्रुपचे सर्व सहकारी उपस्थित होते
आम्ही सज्जन आहोत दुर्बल नाही
कारखान्याच्या एकूणच प्रक्रियेत विरोधकांनी मोठ्या प्रमाणावर विरोध केला त्यामुळे सर्वांच्याच मनात संभ्रम होता मात्र उतार्यावर नाव लागल्याने कारखान्यावर पूर्ण क्षमतेने लक्ष केंद्रित करून येत्या काळात कारखाना पाच हजारावर गाळपक्षमता वाढवावी लागेल तालुक्यात उसाचे क्षेत्र आजही समाधानकारक आहे.त्यात मोठी वाढ होईल चांगल्या कामाला परमेश्वराने शेवटच्या क्षणापर्यंत कसोटी घेतली खरी,आम्ही स्थितप्रज्ञ राहिलो अखेर न्याय मिळाला, विरोधकांनी विधायक कामात अडथळा आणला मात्र आम्ही सज्जन आहोत दुर्बल नाही असा इशारा त्यांनी दिला
भूमीपुत्रांचा अधिकाधिक सहभाग वाढावा
भूमीपुत्रांच्या पैशातून कारखाना उभा राहिला आहे यात पाच लाखाची गुंतवणूक करणारा व पंन्नास लाखांची गुंतवणूक करणार्यांचे सारखेच स्टेटस आहे . दररोज पैश्यांची उपलब्धता करावी लागते कर्मचार्यांचा पगारासह अनेक कामावर पैसा खर्च होतो ज्यांना पैसे गुंतविणे शक्य त्यांनी गुंतवणूक करावी व इतरांनाही या पवित्र कामात जोडावे आजच राष्ट्रीय महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राध्यापक एम एम पाटील(देवळी) यांनी पन्नास लाखांची गुंतवणूक केली असून आज वीस लाखांचा धनादेश त्यांनी अंबाजी कडे सुपूर्द केला शेतीत एक दाणा पेरला तर सहस्त्र दाणे मिळतात असे सांगून तालुक्यातील भूमीपुत्रांनी आपला आधिकधिक सहभाग वाढवावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली
यांची होती उपस्थिती
चेअरमन चित्रसेनदादा पाटील उद्योजक प्रविणभाई पटेल, दत्त डेअरी चे विनायक वाघ, प्रगतिशील शेतकरी उद्धवराव महाजन, प्रसिद्ध ठेकेदार दिलीप दादा चौधरी, बांधकाम साहित्य व्यावसायिक प्रेमचंदभाऊ खिवंसरा वास्तू विशारद किरणदादा देशमुख, अजय शुक्ल, शरदजी मोराणकार,निशांतशेठ मोमाया, अशोकबापू ब्राह्मणकार, विजयभाऊ अग्रवाल, निलेश निकम, एकनाथ चौधरी, प्रसिद्ध अस्थीरोग तद्य डॉ.अभिजित पाटील, राजू धामणे, युवा उद्योजक दिनेशभाई पटेल, श्रीरामजी गुप्ता, माणकचंद लोढा, बेलगंगेचे माजी व्हाईस चेअरमन रवींद्र पाटील, निलेश वाणी, शल्यशोभा रुग्णालयाचे डॉ.मुकुंद करंबळेकर, मोनिका पाटील यांच्यासह अनेक भूमिपुत्रांची उपस्थिती होती.