बेलगंगाच्या विक्री विरोधातील कर्मचार्‍यांची याचिका सुप्रीम कोर्टान फेटाळली

0

चाळीसगाव – बेलगंगा साखर कारखाना विक्री प्रक्रिया व थकीत वेतनासाठी कामगार युनियनने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. आज यावर सुनावणी होऊन सर्वोच्च न्यायालयाने कामगारांना थकीत वेतनाच्या मागणी करावयाची आहे, की लिलावाच्या विक्री प्रकियेला आक्षेप आहे, वा कारखान्याच्या बाबतीत राजकारण करावयाचे आहे, असे फटकारत कर्मचार्‍यांची याचिका फेटाळत निकाली काढली आहे. यामुळे येत्या हंगामात बेलगंगा साखर कारखाना आपला गळीत हंगाम सुरू करणार असल्याने तालुक्याच्या विकासाची चाके गतिमान होणार आहेत.

कामगारांच्या वतीने सेवानिवृत्त न्यायाधीश मालपल्ले ,जेडीसीसी बँकेच्या वतीने एम वाय देशमुख, सिनियर कोन्सिल आर राधाकृष्णन , तर अंबाजी गृप च्या वतीने धनंजय ठोके व संदीप देशमुख सिनियर कोन्सिल जयंत भूषण यांनी काम पाहिले