चाळीसगाव (प्रतिनिधी) – जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेने 2 डिसेंबर 2016 रोजी बेलगंगा सहकारी साखर कारखाना विक्रीचा ठराव केला असून हा कारखाना विकला तर संभाजी सेनेच्या वतीने आंदोलनाचा इशारा देण्यात आला असून बँकेचे अध्यक्ष, संचालक मंडळ यांना कोर्टात खेचून फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा देखील इशारा संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण शिरसाठ यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
कारखाना विक्रीच्या ठरावाला निषेध
संभाजी सेनेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण शिरसाठ यांनी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेचे अध्यक्ष व संचालक मंडळाला दि 6 डिसेंबर 2016 रोजी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि आपल्या जळगाव जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेने 2 डिसेंबर 2016 रोजी चाळीसगाव तालुक्यातील बेलगंगा सहकारी साखर कारखाना विक्रीचा ठराव केला आहे. त्याचा खेद वाटत असून सहकाराच सहकाराचा बळी घेत आहे. एक प्रकारे मोठा मासा छोट्या माश्याला गिळत असल्याचे म्हणावे लागत आहे. सहकाराचा जन्म शेतकरी हितासाठी झाला. जिल्हा बँक ह्या शेतकर्यांसाठी निर्माण झाल्या असून साखर कारखाने देखील शेतकरी हितासाठी निर्माण झाले आहेत असे असतांना आपले संचालक मंडळ बेलगंगा सहकारी साखर कारखाना विक्रीचा निर्णय घेतात याचे आश्चर्य वाटते आपण कारखाना विकू शकत नाही. त्याचे मालक शेतकरी सभासद आहेत, त्यांनी कवडीमोल पैशात त्यांच्या जमिनी दिल्या आहेत, सहकाराच्या माध्यमातून शेतकरी बांधवांचा आणि तालुक्याचा विकास होईल व अनेकांना रोजगार मिळेल या हेतूने जमिनी दिल्या आहेत. आपण जर कारखाना विकणार असाल तर विका परंतु जमीन विक्री केल्यास संभाजी सेनेच्या वतीने आंदोलन तर केलेच जाईल शिवाय आपणांसह सर्व संचालक मंडळाला कोर्टात खेचून फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशारा देखील देणार आला आहे. निवेदनावर संभाजी सेनेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण शिरसाठ यांची स्वाक्षरी आहे.