जळगाव। चाळीसगाव तालुक्यातील बंद पडलेला बेलगंगा साखर कारखाना 39 कोटी 22 लाख रुपयात अंबाजी ट्रेडींग कंपनीने 25 टक्के रक्कम अर्थात (10 कोटी) भरुन खरेदी केला आहे. त्यापैकी 5 कोटी 88 लाख 50 हजारांचा धनादेश बँकेच्या चेअरमन रोहणीताई खडसे-खेवलकर यांच्याकडे सुपूर्द केला आहे. उर्वरित 30 कोटीची रक्कम लवकरच भरली जाणार असून बंद अवस्थेत पडलेला कारखाना शेतकर्यांच्या ताब्यात आला असल्याची माहिती माजी चेअरमन चित्रसेन पाटील यांनी दिली.
शुक्रवारी चित्रसेन पाटील, मानकचंद लोढा, डॉ.अभिजीत पाटील यांच्यासह आदी सहकारी खरेदीच्या रकमेचे धनादेश देण्यासाठी जिल्हा बँकेत आले होते. यावेळी कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख, प्रविण पटेल, दिलीप चौधरी, प्रेमचंद्र खिवसरा, विजय अग्रवाल, निशाण मौमया, निलेश निकम, निलेश वाणी, अजय शुक्ला, अजय माने, सतीश पाटील आदी उपस्थित होते. बेलगंगा साखर कारखान्यावर 71 कोटी बँकेची थकबाकी असल्याने बँकेने विक्री प्रक्रियेस सुरुवात केली होती.