चाळीसगाव: राज्यातील स्थानिक भूमिपुत्रांनी विकत घेतला एकमेव साखर कारखाना म्हणून चर्चिला गेलेला व चेअरमन चित्रसेन पाटील यांच्यासह अंबाजी टीमच्या अथक परिश्रमातून सुरू होत असलेल्या भोरस येथील बेलगंगा साखर कारखानाच्या गव्हाण पूजन व गळीत हंगामाचे उद्या शुक्रवारी शुभारंभ होणार आहे.
कार्यक्रमाला वेरूळ येथील स्वामी शांतीगिरी महाराज उपस्थित राहणार आहे. अध्यक्षस्थानी माजी मंत्री एकनाथराव खडसे असणार आहे. याप्रसंगी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, मा राज्याचे गृह व नगरविकास राज्यमंत्री डॉ.रणजीत पाटील, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, जळगाव मतदारसंघाचे खासदार ए.टी. पाटील, आमदार उन्मेष पाटील, आमदार सतीश पाटील, जिल्हा बँकेच्या अध्यक्ष अॅंड.रोहिणी खडसे-खेवलकर, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष तथा आमदार किशोर पाटील, आमदार सुरेश भोळे, आमदार स्मिता वाघ, आमदार चंदुलाल पटेल, माजी मंत्री सुरेश जैन, जैन इरिगेशनचे चेअरमन अशोक जैन, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, सिद्धेश्वर आश्रम बेलदारवाडीचे हभप ज्ञानेश्वर माऊली, परमपूज्य स्वामी केशवावानंद सरस्वती, बुलढाणा अर्बन बँकेचे राधेश्याम चांडक, दलुभाई जैन, निर्मल सिड उद्योगसमूहाचे प्रमुख तथा माजी आमदार आर.ओ. पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी , माजी आमदार राजीव देशमुख, माजी आमदार साहेबराव घोडे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती राजेंद्र वाडीलाल राठोड, जयवंतराव देशमुख, पत्रकार अजित चव्हाण आदींची उपस्थिती असणार आहे.
उपस्थितीचे आवाहन बेलगंगा साखर कारखाना चेअरमन चित्रसेन पाटील, कार्यकारी संचालक नामदेव पाटील, प्रवीणभाई पटेल, दिलीप चौधरी, प्रेमचंद खीवसरा, माणिकचंद लोढा, दिनेशभाई पटेल, अरुण बापू निकम, डॉ.एम.बी.पाटील, विजय अग्रवाल, धनंजय ठोके, उध्दवराव महाजन, किरण देशमुख, अजय शुकला, सुशिल जैन, अशोक ब्राह्मणकर, श्रीराम गुप्ता , सुजित वर्मा ,रफिक शेख प्रशांत मोराणकर, अभय वाघ , डॉ मंगेश वाडेकर ,जगदीश पाटील , माजी व्हॉईस चेअरमन रवींद्र पाटील , नीलेश वाणी,निलेश निकम, एकनाथ चौधरी ,हिंमत पाटील, डॉ.अभिजित पाटील, एम.एम.पाटील, शरद मोरणाकर, प्रदीप धामणे, हिंमत पटेल, गोरख राठोड, जगदीश पाटील , डॉ.मोनिका पाटील, वर्षा महाजन, कुसुमताई भामरे, पन्ना लोढा यांच्यासह अंबाजी गृपचे सर्व भागधारक व कर्मचारीवृंद यांनी केले आह.