बेलगंगेच्या नव्हे जिल्हा बँकेच्या उताऱ्यावर “अंबाजी”चे नाव; नोव्हेंबरला कारखान्याचा गळीत हंगाम

0

चाळीसगाव – तालुक्याच्या एकूण अर्थकारणावर दुरोगामी परिणाम करणारा बेलगंगा नोव्हेंबर मध्ये गळीत हंगामाला सज्ज झाला आहे. कारखाना सिक्युरी टायझेशनमध्ये गेल्या नंतर कारखान्याच्या सातबारा उताऱ्यावर बेलगंगा सहकारी साखर कारखाना हे नाव कंसात जाऊन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे नाव “मालकी सदरी”लागले होते त्यानंतरचे अनेक “मानवनिर्मित” अडथळे तालुक्यासह भूमीपुत्रांनी अनुभवले आहेत मात्र आता जिल्हा बँकेचे नाव कमी होऊन अंबाजी ग्रुप चे नाव लागल्याने कारखान्याच्या कामाला वेग येणार असून तालुक्याचे जनतेच्या आशा पल्लवित झाल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे

२००३ ला कारखाना पडला बंद
तालुक्यातील दळवळणात मोठा हातभार ठरलेला बेलगंगा सहकारी साखर कारखाना वेगवेगळ्या कारणामुळे टप्याटप्यात प्रत्येक संचालक मंडळाच्या काळात कारखान्याची आर्थिक परिस्थिती खालावत गेली आणि त्यानंतर 2003 साली हा साखर कारखाना बंद पडला दुर्दैवाने जिल्हा बँकेच्या कारखान्याकडे घेणे असलेल्या कर्जापोटी “सिेक्यूरीटायझेशन ऍक्ट” प्रमाणे बँकेने कारखाना ताब्यात घेतला एवढेच नव्हे तर २००६ साली ७/१२ वर बेलगंगा हे नाव कंसात जाऊन जिल्हा बँकेच्या नावे लागले. तेव्हाच कारखाना सभासदांचे सभासदत्व संपुष्टात आले त्यानंतर कारखाना आजतागायत बंद होता मात्र माजी चेअरमन चित्रसेन पाटील यांचा २००७/०८ साली कारखाना भाडेतत्वावर चालविण्याचा यशस्वी प्रयोग केला हा काळ त्याला अपवाद ठरला होता या हंगामात त्यांनी जिल्हा बँकेला भाडेपोटी 2 कोटी रुपये दिले परंतु २००८/०९ जिल्हा बँकेत जे संचालक मंडळ निवडून आले त्यांनी आकसापोटी व राजकीय द्वेषाने हा भाडे करार रद्द केल्याची चर्चा त्यावेळी तालुक्यात सर्वत्र दिसून आली त्यानंतर जिल्हा बँकेच्या या संचालक मंडळाने परत भाड्याने देण्यासाठी निविदा ही काढली नाही किंवा विक्रीसाठी साठी देखील निविदा काढली नाहीत्यामुळे अपवाद वगळता आज तागायत कारखाना बंद होता ही वस्तुस्थिती आहे

बँकेच्या विद्यमान संचालकांचे “एक पाऊल पुढे”
कारखाना बंद असतानाचे संचालक मंडळ जाऊन नव्या निवडणुकीत एकनाथराव खडसेच्या मुख्य नेतृत्वात निवडून आलेले जिल्हा बँकेच्या विद्यमान संचालक मंडळाने जिल्हा बँकेच्या आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी भाडेतत्वावर कारखाना चालविण्याचे बऱ्याचदा आवाहन केले मात्र कोणीही पुढे आले नाही. परिणामी जिल्हा बँकेने कारखाना विक्रीचा निर्णय घेतला आणि २००६ साली त्यांच्या मालकीच्या असलेल्या कारखाना मालमत्ता विक्रीस काढली याकरिता ५ डिसेंबर २०१६ विक्रीची निविदा प्रसिद्ध केली

राज्यात भूमीपुत्रांचा एकमेव कारखाना
कारखाना विक्रीचे अनेक व्यवहार राज्यात झाले , मात्र हे कारखाने कुठल्या तरी उद्योगसमूहाने अथवा भांडवलदारांनी विकत घेतले आहे आपलाही कारखाना असाच कोणी तरी विकत घेईल या भीतीने माजी चेअरमन चित्रसेन पाटील यांनी लोकसहभागातून भूमीपुत्रांनी हा कारखाना विकत घ्यावा अशी भूमिका मांडली त्याला प्रतिसाद मिळाला एवढेच नव्हे तर आश्चर्यकारकरित्या तालुक्यातून चाळीस कोटी रुपयांची
रक्कम उभी राहिली जिल्हा बँकेची पूर्ण रक्कम अदा केल्यानंतर जिल्हा बँकेने ११जानेवारी ला “सेल सर्टिफिकेट” अंबाजीला अदा केले १८जानेवारीला प्रत्यक्ष ताबा देऊन “पझेशनसर्टिफिकेट” दिले तसे पाहता अंबाजीने ११जानेवारीला खरेदीखत केल्यानंतर जानेवारी अखेर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे नाव कमी होऊन अंबाजी चे नाव लागणे अपेक्षित होते तशी अटकळ ही तालुक्यायील शेतकऱ्यांमध्ये दिसून आली होती

हरकती वेगवेगळ्या स्वार्थासाठी ?
ज्यावेळी २००६ साली कारखान्याचे नाव मालक सदरी कमी होऊन जेडीसीसी बँकेचे नाव मालक सदरी लागले त्यावेळी कोणीही हरकती घेतल्या नाहीत ही बाब अख्या तालुक्याला माहीत आहे त्यानंतर बरोबर बारा वर्ष्यानंतर किंबहुना बँकेने निविदा काढल्यानंतरही कोणी हरकती घेतल्या नाहीत परंतु उतारा नावे लागण्याच्या प्रक्रियेत वैयक्तिक स्वार्थापोटी व राजकीय आकसाने हरकती दाखल झाल्या ही वस्तुस्थिती आहे मात्र या मुळे अंबाजीचा सहा महिन्यापेक्षा अधिक कालावधी तांत्रिक अडचणीत गेला मात्र एकापेक्षा एक अनुभवी मातब्बर असलेला भूमीपुत्रांचा अंबाजी ग्रुप डगमगला नाही या गेलेल्या कालावधीवर मात करून येत्या नोव्हेंबर मध्ये गळीत हंगाम सुरू करण्याचे आवाहन ते कसे पेलतात याकडे तालुक्याचे लक्ष वेधले गेले आहे. एक मात्र नक्की बेलगंगेचे नाव कमी ७/१२ उतारा अंबाजीच्या नावे झाला असे नसून २००६ ला बेलगंगेचे नाव कंसात जाऊन जेडीसीसी बँक मालक झाली होती आणि आता जेडीसीसी चे नाव कमी होऊन अंबाजी चे मालक सदरी लागले आहे

कारखान्याचे नाव “बेलगंगा” राहणार – चित्रसेन पाटील
गेल्या सहा सात महिन्यात अनेक मानवनिर्मित तांत्रिक अडथळ्यांची शर्यत पार केली आहे त्याचे दुःख नाही वेळ वाया गेला याची खंत आहे आता उतारा नावे झाल्याने संपूर्ण चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे येत्या नोव्हेंबर मध्ये कारखाना गळीत हंगाम सुरू करेल असे नियोजन आखले आहे सहकार महर्षी स्व. रामराव जीभाऊंच्या माध्यमातून चाळीसगाव ची ओळख राज्यात पोहचविणाऱ्या या कारखान्याचे नाव “बेलगंगा साखर कारखाना” असेच राहील अशी माहिती चेअरमन चित्रसेन पाटील यांनी जनशक्तीशी बोलताना सांगितले आहे