बेलदारवाडी येथे अखंड हरिनाम संकिर्तन सप्ताहाचे आयोजन

0

चाळीसगाव । तालुक्यातील श्री सिध्देश्वर आश्रम बेलदारवाडी (व संगमावर असलेल्या गणपुर, गणपुर तांडा, कोदगाव ) येथे सालाबादाप्रमाणे भगवंताच्या कृपेने व साधुसंतांच्या आर्शिवादाने पंचक्रोशितील समस्त ग्रामस्थ आणि हभप ज्ञानेश्वर माऊली, बेलदारवाडी यांच्या वतीने 18 फेब्रुवारी 2017 ते 25 फेब्रुवारी 2017 या दरम्यान श्री. ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व शिवपुराण कथा अखंड हरिनाम संकिर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून भाविकांनी ज्ञानाजर्नाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

कार्यक्रमांची दैनंदिनी याप्रमाणे,

भात पेैरी व काकडा भजन सकाळी 5 ते 7, प्रार्थना – विष्णू सहस्त्रनाम, सकाळी 7 ते 8, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण – सकाळी 7 ते 12 दुपारी 12 ते 2, भागवत कथा – दुपारी 2 ते 5, हरिपाठ – सायंकाळी 5 ते 6. 18 ते 24 फेब्रुवारी दरम्यान रोज रात्री 8.30 ते 10.30 दरम्यान किर्तन होणार असून यात 18 रोजी हभप तुकाराम महाराज जेऊरकर, 19 रोजी हभप उमेश महाराज दशरथे, 20 रोजी हभप काका महाराज पहाणे, 21 रोजी हभप उध्दव महाराज मंडलिक, 22 रोजी हभप डॉ. बाळसराफ महाराज (पीएचडी रसायनशास्त्र मुंबई), 23 रोजी हभप ज्ञानेश्वर महाराज जळकेकर यांचे किर्तन होणार असून 24 रोजी दुपारी 1 ते 3 यावेळेत हभप नंदन सर ताहाराबाद व हभप जगन्नाथ महाराज पाटील भिवंडी यांचे किर्तन होणार आहे.

25 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 ते 10 पर्यंत हभप महादेव महाराज राऊत बीळ यांचे काल्याचे किर्तन होणार आहे. 25 रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंन्त महाप्रसादाचा कार्यक्रम होणार असून भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. 24 रोजी महाशिवरात्रीच्या दिवशी दुपारी 3 ते 5 पालखीची मिरवणूक होणार असून रात्री 11 ते 2 हभप शिवाजी नाना हडपे घोडेगाव यांचे भारूड रात्री गोंदेगावकर भजनी मंडळी व परिसरातील भजनी मंडळाचा जागर होणार आहे. कार्यक्रमासाठी शेषराव पाटील जि.प. सदस्य कोदगाव, आमदार उन्मेश पाटील मित्र मंडळ चाळीसगाव, रावसाहेब भिकनराव पाटील चाळीसगाव, लिलाताई ठाकूर उंबरखेड, नंदलाल कुमावत तामसवाडी, भुषण पाटील मित्र मंडळ कोदगाव, उत्तमराव राठोड शामवाडी, देवराम राठोड वलठाण, बी.आर.येवले, यांचे विशेष सहकार्य असणार आहे.