पाळधी । धरणगाव तालुक्यातील धार या गावातील बेलदार वाडी हा रस्ता अत्यंत खराब झाल्याने गावांतील नागरीकांच्या समस्या जाणून घेवून सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाने जि.प.सदस्य प्रतापराव पाटील यांनी त्वरीत मुरूम टाकून रोलने रस्त्याचे काम केले. त्यामुळे गावात समाधान व्यक्त होत आहे. रस्त्यांची पाहणी करतांना जि.प.सदस्य प्रतापराव पाटील, विकी पाचपोळ, आबा माळी, नवलसिंग पाटील, भैय्या पाटील, मिलिंद सपकाळ, पिंटू कोळी आदी.