बेल्ट मिळविण्यासाठी खेळाडुंच्या कराटे स्पर्धा

0

निवड झालेल्या खेळाडुंचा सत्कार समारंभाचे आयोजन

चिंचवड : येथील मोहननगर परिसरातील जपान नोबुकावा हा शितो-रिओ कराटे डो इंडिया या संस्थेच्या खेळाडुंची बेल्ट परिक्षा रेंशी नरेश शर्मा सर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी उत्तीर्ण झालेल्या खेळाडुंचे बेल्ट वाटप व राज्यस्तरीय स्पर्धेत निवड झालेल्या खेळाडुंचे सत्कार करण्यात आले. यावेळी नगरसेवक प्रमोद कुटे, माजी नगरसेवक प्रसाद शेट्टी, माजी नगरसेवक मारूती भापकर, बांधकाम व्यावसायिक संजय पुंडे, सामाजिक कार्यकर्ते रखमाजी हुच्चे, उद्योजक पराग जाधव आदी उपस्थित होते.

यावेळी परिक्षक म्हणून जपान नोबूकावा हा शितो-रिओ कराटे डो इंडियाचे अध्यक्ष रेंशी नरेश शर्मा सर, महाराष्ट्राचे अध्यक्ष नंदकुमार दळवी, कमलेश पांडे, अशोक वेताळ, सातारा जिल्हाध्यक्ष सुनील कदम, नवी मुंबई जिल्हाध्यक्ष किसन धनवडे, ठाणे जिल्हाध्यक्ष संजू मोजर आदी उपस्थित होते. उपस्थित पाहुण्यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमासाठी प्रशिक्षक स्वप्नील गायकवाड, विशाल दौंडकर, शिवतेज सावंत, सुशांत कांबळे, विवेक यादव, दिनेश विश्‍वकर्मा यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे आयोजन अविनाश काळे, सागर पुंडे, अमोल घोडके आदींनी केले होते.